भिवंडीत महायुतीचा महापौर सत्तेवर बसेल

भिवंडीत महायुतीचा महापौर सत्तेवर बसेल

Published on

भिवंडीत महायुतीचा महापौर सत्तेवर बसेल
भाजप गटनेते संतोष शेट्टी यांना विश्वास
भिवंडी, ता. ३ (वार्ताहर) ः भिवंडी महानगरपालिकेतील महापौरपदासाठी सत्तेची समीकरणे जमवण्यात महायुतीसह भिवंडी सेक्युलर फ्रंट कामाला लागले आहेत. अशात भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचा महापौर सत्तेवर बसेल, असा विश्वास भाजप गटनेते संतोष शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
भिवंडीत भाजपचे २२, शिवसेनेचे १२, एक अपक्ष असे ३५चे संख्याबळ महायुतीकडे आहे. त्यांना मॅजिक फिगर ४६ गाठण्यासाठी ११ सदस्य कमी आहेत. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी भाजप निवडणूक प्रभारी आमदार महेश चौघुले, शहराध्यक्ष रवी सावंत व आपण स्वतः महापौरपदासाठीची जुळवाजुळवी करण्यात व्यस्त आहोत. त्यामध्ये अनेक सदस्यांकडून महायुतीला सुप्त पाठिंबा असल्याचे सूतोवाच केले जात आहे. यामध्ये आमचे इतर पक्षातील वैयक्तिक संबंधसुद्धा कामी येत असल्याने भिवंडी पालिकेत भाजप महायुती चमत्कार घडवून महापौरपदावर भाजपचा उमेदवार निवडून आणेल, असा विश्वास आहे. पक्षश्रेष्ठी महायुतीसोबत बोलून ज्या नावाला पसंती देतील, तो महायुतीचा अर्थात भाजपचा उमेदवार असेल, अशी ग्वाही संतोष शेट्टी यांनी दिली आहे. भाजपकडून आमदार महेश चौघुले समर्थक, ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांचे नाव सध्या महापौरपदासाठी आघाडीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com