सहा वर्षांनंतर उघडणार महापौर निवासस्थानाचे दरवाजे

सहा वर्षांनंतर उघडणार महापौर निवासस्थानाचे दरवाजे

Published on

बेलापूर, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील एक महत्त्वपूर्ण वास्तू म्हणजे महापौर निवास. गेली सहा वर्षे महापालिकेवर प्रशासक असल्याने हे महापौर निवास बंद होते, मात्र अलीकडेच निवडणूक पार पडल्यानंतर महापौरपदाची नेमणूक गुरुवारी (ता. ५) पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर बेलापूर येथील पारसिक हिल परिसरात असणाऱ्या महापौर निवासाचे दरवाजे अखेर सहा वर्षांनंतर उघगडणार आहेत.

२०१४ मध्ये नवी मुंबई महापालिका निवडणूक पार पडली. त्यानंतर २०२० मध्ये नवीन लोकप्रतिनिधी निवडणे अपेक्षित असताना कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. अखेर तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये नवी मुंबईत भाजप आघाडीवर, तर एकनाथ शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यानंतर प्रतीक्षा राहिली महापौर निवडीची. अलीकडेच महापौर निवडीसाठी अर्ज दाखल झाले असून, आता महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे. दुसऱ्या बाजूला सहा वर्षांच्या प्रशासकीय कामानंतर महापालिकेवर महापौर नियुक्त होणार असल्याने त्यांच्या निवासस्थानाच्या देखभालीला प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांत या ठिकाणी कोणताही वावर नसल्याने केवळ सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र, आता सुरक्षा रक्षक संख्या वाढवण्यासोबत वास्तूची स्वच्छता, देखभालीला सुरुवात झाली आहे.

महापौर निवासस्थानी सीसीटीव्ही नाहीत
शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरपदाकडे पाहिले जाते. शहरात प्रशासकीय काम करत असताना महापौरांना बेलापूर येथील पारसिक हिल परिसरात निवासस्थान उपलब्ध आहे. मात्र, आलिशान अशा या निवासस्थानी सीसीटीव्ही नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com