ब्रिम्स येथे भारतीय ज्ञान प्रणालीवर राष्ट्रीय परिषद

ब्रिम्स येथे भारतीय ज्ञान प्रणालीवर राष्ट्रीय परिषद

Published on

ब्रिम्सतर्फे भारतीय ज्ञान प्रणालीवर राष्ट्रीय परिषद

ठाणे, ता. ४ : डॉ. व्ही. एन. बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीआरआयएमएस म्हणजेच ब्रिम्स) यांच्यातर्फे ‘नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवसाय व्यवस्थापन पद्धतींचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणालीचे एकत्रीकरण’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही राष्ट्रीय परिषद शनिवारी (ता. ७ फेब्रुवारी २०२६) पाणिनी सभागृह, विद्या प्रसारक मंडळाच्या ज्ञानद्वीप संकुलात (ब्रिम्स कॅम्पस) येथे पार पडेल.
ब्रिम्स ही संस्था आपल्या शैक्षणिक शिस्तीबद्दल व सर्वांगीण व्यवस्थापन शिक्षणाबाबतच्या वचनबद्धतेसाठी ओळखली जाते. एक अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षण संस्था म्हणून ब्रिम्स सातत्याने विद्वत्तापूर्ण उत्कृष्टतेची सांगड व्यावहारिक व उद्योगकेंद्रित शिक्षणाशी घालत आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन संस्थेने विद्वत्ता व औद्योगिक प्रासंगिकतेचा संतुलित संगम साधला आहे. संचालक डॉ. नितीन जोशी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत व्यावहारिक औद्योगिक अनुभव व सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेली मूल्ये जोपासली जात आहेत. या राष्ट्रीय परिषदेचा मुख्य उद्देश भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस) आजच्या वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक जगात व्यवस्थापनाला कशी समृद्ध व बळकट करू शकते, याचा सखोल अभ्यास करणे हा आहे. आजच्या काळात उद्योग-व्यवसाय तंत्रज्ञान व नावीन्यपूर्णतेवर आधारित असताना, भारताच्या कालातीत बौद्धिक परंपरा, नैतिकता, नेतृत्व, शाश्वतता आणि सर्वांगीण व्यवस्थापनाची मूल्ये हे व्यवसाय विश्वाला एक वेगळा व प्रभावी दृष्टिकोन प्रदान करतात.
प्रख्यात लेखक, संशोधक व टेड टॉक वक्ते डॉ. नीलेश ओक तसेच दासबोधाचे अभ्यासक समीर लिमये यांची व्याख्याने हे परिषदेचे प्रमुख आकर्षण आहे. ते अनुक्रमे भारतीय ज्ञान प्रणाली व दासबोधातून मिळणाऱ्या व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
सादरीकरणे, तज्ज्ञांची व्याख्याने, शोधनिबंध सत्रे व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांच्या माध्यमातून ही परिषद पारंपरिक ज्ञान व आधुनिक व्यवस्थापन गरजांमधील दुवा बळकट करणार आहे. शिक्षणतज्ज्ञ, व्यवस्थापक, उद्योजक, संशोधक, विद्यार्थी व नागरिकांनी या ज्ञानवर्धक परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com