मित्रपक्षच आमने-सामने
मित्रपक्षच आमनेसामने
अलिबाग पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) : अलिबाग पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती झाली नसल्याने हे मित्रपक्ष आमनेसामने येणार आहेत.
रायगड जिल्ह्यात महायुतीचे घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत. मात्र शेकाप, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतून एकत्र लढत आहेत. शिवसेनेने १४, शेकापने १३, भाजपने ८, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाने दोन, ठाकरेंच्या शिवसेनेने एक आणि काँग्रेसने एका जागेवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत.
२०१७ साली झालेल्या निवडणुकीत शेकापने अलिबाग पंचायत समितीवर वर्चस्व ठेवले होते. आगामी अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती झाली नसल्याने ते वेगवेगळे लढत आहेत. अनेक गणांतून तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी अलिबाग पंचायत समितीत खरी लढत ही शिवसेना आणि शेकाप या दोन पक्षांत होणार आहे. त्यामुळे अलिबाग पंचायत समिती शेकाप राखणार की शिवसेना खेचून आणणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रियदर्शिनी पाटील यंदा चेंढरे गणातून भाजपतर्फे लढत आहेत. महेश गुरव हे २०१७ मध्ये आक्षी गणातून पराभूत झाले होते. ते पुन्हा त्याच गणातून ठाकरेंच्या शिवसेनेतून रिंगणात उतरले आहेत. रेवदंडा गणातून २०१७ मध्ये विजयी झालेले भाजपचे उदय काठे यंदाही निवडणुकीला सामोरे जात आहेत.
प्रचाराला गती
तीन अपक्षही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वैजाळी, शहापूर, आंबेपूर, रुईशेत भोमोली, आवास, किहीम, थळ, वरसोली, चेंढरे, आक्षी, रेवदंडा, चैल, कावीर आणि रामराज असे १४ पंचायत समिती गण आहेत. अलिबाग पंचायत समितीवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. उमेदवारांचा प्रत्यक्ष मतदार भेटीवर जोर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

