निवडणुकीसाठी पनवेलमध्ये वाहतुकीत बदल
पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. व्ही. के. हायस्कूल परिसरातील चार प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सोमवारी (ता. ९) दोन्ही मार्ग मतमोजणी प्रक्रियेसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. त्याबाबतचे आदेश नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी काढले आहेत.
पनवेल तालुक्यामध्ये शनिवारी (ता. ७) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी मतदान साहित्य संकलन, वितरण आणि मतमोजणीसाठी पनवेलमधील व्ही. के. हायस्कूल येथे मुख्य केंद्र ठेवण्यात आले आहे. त्यासाठी या ठिकाणी शेकडो बस आणि वाहनांच्या हालचाली होणार असल्याने या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा परिसरातील चार प्रमुख मार्गांवर प्रवेश बंदी लागू केली आहे. त्यानुसार अमरधाम ते व्ही. के. हायस्कूल (वडाळे तलाव विसर्जन घाट) रस्ता, वडाळे तलाव बीट चौकी ते व्ही. के. हायस्कूल रस्ता, नवीन पनवेल सिग्नल ते व्ही. के. हायस्कूल रस्ता तसेच नवीन पनवेल सिग्नल ते अमरधाम जाणारा सेवा रस्ता हे चार मार्ग ६ फेब्रुवारी मध्यरात्री १२ पासून ते ७ फेब्रुवारी रात्री ११ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे ९ फेब्रुवारीला पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत अमरधाम ते व्ही. के. हायस्कूल आणि नवीन पनवेल सिग्नल ते व्ही. के. हायस्कूल हे दोन मार्ग मतमोजणी प्रक्रियेसाठी बंद राहणार आहेत.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
अमरधामकडून जाणाऱ्या वाहनांसाठी अमरधाम-पनवेल न्यायालय, नवीन पनवेल सिग्नल किंवा सावरकर चौक, लाइन आळीमार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. त्याचप्रमाणे वडाळे तलाव परिसरातील वाहनांसाठी वडाळे तलाव बीट चौकी-पनवेल न्यायालय, सावरकर चौकमार्गे प्रवास करता येणार आहे. तसेच नवीन पनवेलकडून येणाऱ्या वाहनांना नवीन पनवेल सिग्नल-लाईन आळीमार्गे किंवा अमरधाम-गार्डन हॉटेल सिग्नलमार्गे मुख्य रस्त्याचा वापर करून निश्चित स्थळी जाता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

