ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Published on

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ध्यानाचा ‘मंत्र’
पालघरमधील आश्रमशाळेत तीनदिवसीय शिबिर
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणे मोठे आव्हान झाले आहे. हेच ओळखून पालघर जिल्ह्यातील परळी (वाडा) येथील शासकीय आश्रमशाळेत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी तीनदिवसीय ध्यान (मेडिटेशन) शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या शिबिरात सर्च विदिन फाउंडेशनचे संस्थापक अमोल काजरोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या काळात मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडिया आणि टीव्हीमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होत आहे. यावर उपाय म्हणून ध्यानाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. शिबिराचे मुख्य उद्देश हा ध्यानाच्या माध्यमातून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे हा होता. ताणतणावाचे नियोजन आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करणे, शिस्त आणि संयमाद्वारे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधणे, यासाठी शिबिर आयोजित केले होते. ध्यानामुळे केवळ अभ्यासातच नाही, तर आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी लागणारी मानसिक शक्ती विद्यार्थ्यांना मिळते.

हे शिबिर लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रवीण काजरोळकर, विश्वस्त लता परब आणि कैलास रेडीज यांच्या पुढाकाराने राबवण्यात आले. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विलास बंजारा यांनी ‘सर्च विदिन’चे कोकण विभाग समन्वयक संजय हुंबरे आणि सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com