स्वच्छतेसमोरील अडसर

स्वच्छतेसमोरील अडसर

Published on

स्वच्छतेसमोरील अडसर
रस्त्यांवरील भंगार वाहनांची वाढती समस्या
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने शहरभर स्वच्छता मोहिमेला वेग दिला आहे. शहराला स्वच्छतेत देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि वस्ती भागात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असून, यंदाही मनपा आयुक्तांनी आढावा बैठक घेऊन काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र अनेक भागांत रस्त्यांकडेला उभी असलेली भंगार व निष्क्रिय वाहने स्वच्छतेच्या प्रयत्नांना मोठा अडसर ठरत आहेत. या वाहनांभोवती कचरा साचत असून दुर्गंधी, डासांचा उपद्रव आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी शहराच्या सौंदर्यावरही नकारात्मक परिणाम होत आहे.
चौकट
एमआयडीसी परिसरातील गंभीर परिस्थिती
एमआयडीसी परिसरात हा प्रश्न अधिक तीव्र स्वरूपाचा आहे. इलेक्ट्रॉनिक झोनमधील एल अँड टी कंपनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका खासगी कुरिअर कंपनीची सुमारे ५० हून अधिक वाहने वर्षभरापासून उभी आहेत. ही वाहने वापरात नसून, भंगार स्वरूपात पडून असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि कामगारांची गैरसोय वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. रस्त्यांवरील भंगार वाहने तातडीने हटवून संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा स्वच्छ सर्वेक्षणातील मनपाचे प्रयत्न केवळ कागदापुरतेच मर्यादित राहतील, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com