आज महापाैरपदावर शिक्कामोर्तब

आज महापाैरपदावर शिक्कामोर्तब

Published on

वाशी, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी उद्या गुरुवारी (ता. ५) निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक महापालिकेच्या मुख्यालयातील पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहात पार पडणार आहे. या निवडणुकीकडे शहराचे लक्ष लागले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महापौरपदासाठी भाजपकडून सुजाता पाटील, तर शिवसेनेकडून (शिंदे गट) सरोज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपकडून दशरथ भगत, तर शिवसेनेकडून आकाश मढवी यांनी अर्ज भरले आहेत. महापालिकेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता, गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपने स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठलेला आहे. भाजपकडे ६५ नगरसेवक असून, याशिवाय एका अपक्ष नगरसेवकाचा तसेच शिवसेना ठाकरे गटातील दोन नगरसेवकांचा पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे दोन्ही पदांवर भाजपचाच उमेदवार निवडून येणे निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणारी निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरण्याची शक्यता आहे.

भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आल्यास महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्ताकारणासोबतच विरोधी पक्षाची भूमिका कशी असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेकडून ताकद दाखवण्याचा प्रयत्न
सभागृहात अधिकृत घोषणा झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या सत्तेचा कारभार भाजपच्या हाती जाणार आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडे महापालिकेत ४२ नगरसेवकांचे संख्याबळ असून, त्यांनीदेखील महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार उभे करून आपले राजकीय वर्चस्व आणि ताकद दाखवून दिली आहे. मात्र संख्याबळ कमी असल्याने त्यांचा विजय अशक्य मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com