ठाण्यात मोबाईल फोन लांबवला
बीएमसी सफाई कामगाराचा मोबाईल फोन चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : डोंबिवली येथे राहणारे राहुल नराबडे (३८) हे ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वर लोकलची वाट पाहताना, त्यांना बसल्या जागी झोप लागली. याचदरम्यान चोरट्याने त्यांचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरला आहे. ते मुंबई महापालिकेमध्ये सफाई कामगार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्व येथे राहणारे नराबडे हे कांजूर मार्ग, मोरारजी नगर येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. कामावरून परतताना ते दररोज लोकल ट्रेनने प्रवास करतात. बुधवारी (ता. ४)रात्री कामावरून सुटल्यानंतर कांजुरमार्ग येथून ठाणे लोकलने ते ठाणे रेल्वे स्थानकात रात्री सुमारे ११ वाजता पोहचले. डोंबिवलीकडे जाणाऱ्या लोकलची वाट पाहत असताना फलाट क्रमांक २ वरील मधल्या ब्रिजखाली कट्ट्यावर बसले असता, दिवसभराच्या कामामुळे त्यांना झोप लागली. गुरुवारी (ता. ५) रात्री सुमारे २ वाजता त्यांना जाग आल्यावर त्यांनी पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन तपासला असता तो आढळून आला नाही. आजूबाजूला शोध घेतला असता मोबाईल न मिळाल्याने अज्ञात चोरट्याने झोपेचा फायदा घेऊन मोबाईल चोरी केल्याचे तक्रारीत त्यांच्यावतीने नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

