मच्छर उपद्रव वाढल्याने जोगेश्वरी पूर्वेतील एम.एच.बी कॉलनीत धूरफवारणी
डासांचा उपद्रव वाढल्याने जोगेश्वरी पूर्वेतील एमएचबी कॉलनीत धूरफवारणी
जोगेश्वरी, ता. ५ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्वेतील सर्वोदयनगर मार्गावरील एमएचबी कॉलनी क्रमांक तीन ते २१ तसेच वरच्या एमएचबी कॉलनीतील गणेश मैदानाजवळील एका चाळीत डासांचा वाढता उपद्रव आढळून आला होता. यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आज संबंधित परिसरात धूरफवारणीची कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान गणेश मैदानाजवळील एका चाळीत डासांच्या अळ्या आढळून आल्याने त्या तत्काळ नष्ट करण्यात आल्या. तसेच काही चाळींमध्ये घरातील दुरुस्ती कामे सुरू असल्याने साचलेले पाणी व अस्वच्छता निर्माण झाली होती. यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संबंधित चाळींमध्ये तसेच संपूर्ण परिसरात धूरफवारणी करण्यात आली असल्याची माहिती के. पूर्व विभागाच्या आरोग्य विभागातील कीटकनाशक विभागाचे कर्मचारी महेश आमटे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

