नगरसेवकांना १० हजारांचे मानधन

नगरसेवकांना १० हजारांचे मानधन

Published on

जनसेवकांना पालिकेचे इंधन
वसई-विरारमध्ये वाहन प्रतिपूर्ती भत्ता मिळणार
विरार, ता. ५ (बामतीदार)ः वसई-विरार पालिकेच्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, सभागृह नेते, सर्व सभापतींना वाहन प्रतिपूर्ती भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे ३,९०० कोटींचे बजेट असलेल्या पालिकेकडे स्वतःची वाहने नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्थानिक स्वराज्य सस्थांमध्ये ग्रामपंचायत सरपंचांपासून, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर अशा सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या अडीच किंवा पाच वर्षांच्या कालावधीत मानधन तसेच विविध सोयीसुविधा देण्यात येतात. अनेक शहरांमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांच्यासाठी शासकीय निवासस्थान आहेत, पण वसई-विरारमध्ये फक्त नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत दोन वर्षांपासून प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. मात्र, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना या इमारतीत बसण्याची संधी ३ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व पदाधिकाऱ्यांचे दालन सज्ज केले आहेत.
--------------------------------
२०१६ पूर्वीची आकडेवारी
पद वाहन भत्ता (हजारांमध्ये)
महापौर ४५
उपमहापौर ४०
स्थायी सभापती ४०
विरोधी पक्षनेता ३७
पालिका आयुक्त ७५
अधिकारी ४० ते ४५
=========================================
सदस्यांना १० हजार मानधन
ृः- पालिकेच्या वर्गवारीनुसार नगरसेवकांना मानधन दिले जाते. राज्यातील २९ महापालिकांपैकी चार महापालिका क वर्गात समाविष्ट आहेत. यामध्ये वसई-विरार महापालिकेचा समावेश आहे. त्यामुळे येथील नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन महापालिकेकडून देण्यात येणार आहे.
- निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांसह स्वीकृत १० नगरसेवकांनासुद्धा सदर मानधन देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचा नगरसेवकांच्या मानधनावर प्रत्येक महिन्याला १२ लाख ५० हजार एवढा खर्च होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com