वैज्ञानिक कल्पनांना ‘उमंग’चे व्यासपीठ
वैज्ञानिक कल्पनांना ‘उमंग’चे व्यासपीठ
लालोंडे येथील शासकीय आश्रमशाळेत तंत्रज्ञान मेळावा
बोईसर, ता.५(वार्ताहर): इंटरनॅशनल फ्लेवर्स अँड फ्रेग्रन्स, आर्च डेव्हलपमेंट फाउंडेशन बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा ‘उमंग’ हा शैक्षणिक प्रकल्पतीन वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील बोईसर, पालघर तालुक्यातील शाळांमध्ये सीएसआर अंतर्गत सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत २० शाळांमध्ये विज्ञानावर आधारित स्टेम प्रयोग तसेच ५ शाळांमध्ये पुनराभ्यास वर्ग घेण्यात येत आहेत.
या प्रकल्पाअंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालोंडे (बेटेगाव) येथे तंत्रज्ञान मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी ड्रोन, रोबोटिक्स, आधुनिक तंत्रज्ञान, दैनंदिन जीवनातील विज्ञान, ग्रीन बाइट्स आणि कौशल्य विकास अशा विविध विभागांच्या प्रतिकृती सादर केल्या. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद विस्तार अधिकारी सुरेश कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक राजेश म्हात्रे आणि उमंग प्रकल्प प्रमुख हार्दिक पांड्या यांच्या हस्ते करण्यात आले.
------------------------------
५०० विद्यार्थ्यांची भेट
विद्यार्थ्यांना ड्रोन बनविणे व उडविण्याबाबत प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली. तसेच मुलींनी प्लंबिंग, बागकाम, इलेक्ट्रिक कामे आणि सायकल पंक्चर दुरुस्ती यांसारखी जीवन कौशल्ये सादर केली. १७५ विद्यार्थ्यांनी ८३ कृती सादर केल्या असून ५०० विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

