फुटपाथच झाला गोदाम
पदपथच झाला गोदाम
बदलापूर पूर्व पनवेल महामार्गावर नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ
बदलापूर, ता. ५ (बातमीदार) ः बदलापूर पूर्व येथील पनवेल महामार्ग परिसरात दुकानदारांकडून सर्रासपणे पदपथावर बांधकाम साहित्य साठवले जात आहे. यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, रस्त्यांवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पनवेल महामार्ग परिसरात दुकानदारांकडून पदपथावर विनापरवाना बांधकाम साहित्य ठेवले जात आहे. दुकानांच्या बाहेर सिमेंटच्या गोण्या, फरशा, लोखंडी साहित्य व इतर बांधकाम साहित्य ठेवण्यात आल्याने फुटपाथ अक्षरशः अडवला गेला आहे. आधीच वर्दळीचा असलेला हा महामार्ग आणि त्यातच चालण्यासाठी सुरक्षित पदपथ उपलब्ध नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना याचा मोठा फटका बसत असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पदपथ हा पादचाऱ्यांसाठी असतो की दुकानदारांच्या बांधकामासाठी, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित दुकानदारांकडून कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक जागेचा अतिक्रमणासाठी वापर केला जात असताना पालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे परिसरात अस्वच्छताही वाढली असून, सांडपाणी, कचरा आणि बांधकाम साहित्य यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आंदोलनाचा इशारा
तातडीने अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळा न केल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही स्थानिकांकडून दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

