बेकायदा बांधकामांवरून कारवाईचा दम

बेकायदा बांधकामांवरून कारवाईचा दम

Published on

बेकायदा बांधकामांवरून महापौरांचा दम
पालिकेतील अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा इशारा
भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील बेकायदा बांधकामांवरून नवनियुक्त महापौर डिंपल मेहतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशा प्रकरणांमध्ये कारवाई करा, अन्यथा बडतर्फीच्या कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
मिरा-भाईंदर शहरातील विविध नागरी प्रश्नांवरून महापौर सक्रिय झाल्या आहेत. याच अनुषंगाने बुधवारी (ता. ४) प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत शहरातील विकासकामांचा आढावा महापौरांनी घेतला. या वेळी शहरातील बेकायदा बांधकामांवरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शहरात बेधडकपणे अशी बांधकामे सुरू असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची भूमिका मांडली. तसेच प्रत्येक प्रभागातील सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागात होत असलेल्या बांधकामांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा महासभेत बडतर्फीचा प्रस्ताव आणण्याचा इशारा मेहतांनी दिला आहे. या बैठकीला आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त राधाबिनोद शर्मा तसेच सर्व महापालिका अधिकारी उपस्थित होते.
----------------------------
आयुक्तांकडून झाडाझ़डती
निवडणूक काळात शहरात बेकायदा बांधकामांची संख्या वेगाने वाढली आहे. याविरोधात आयुक्तांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र प्रभाग अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधकामे झाली नसल्याचे आयुक्तांना सांगितले होते. त्यावर प्रभागात एकही अनधिकृत बांधकाम झालेले नाही, असे प्रमाणपत्र दर आठवड्याला सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com