निजामपूरमध्ये स्थलांतरित मतदार ठरणार निर्णायक

निजामपूरमध्ये स्थलांतरित मतदार ठरणार निर्णायक

Published on

निजामपूरमध्ये स्थलांतरित मतदार ठरणार निर्णायक
फोन, भावनिक साद घालत गावाकडे परतण्याचे आवाहन

माणगाव, ता. ५ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल यंदा स्थलांतरित मतदारांच्या हाती असल्याचे समजते. या मतदारसंघात सुमारे ३९ हजार मतदार आहेत. त्यातील नोकरी, व्यवसाय आणि उदरनिर्वाहाच्या शोधात राज्याबाहेर व मोठ्या शहरांत स्थलांतरित झालेले सुमारे आठ हजार मतदार आहेत. या मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी स्थलांतरित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. फोन संपर्क, प्रत्यक्ष भेटीगाठी, आवाहने आणि भावनिक साद याद्वारे या मतदारांना मतदानासाठी गावाकडे परत येण्याचे आवाहन केले जात आहे.
माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पाली या तालुक्यांतील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात सुरत, मुंबई, ठाणे आणि पुणे येथे स्थलांतरित झाले आहेत. ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात नोकरी, उद्योगधंदे आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध नसल्याने हे स्थलांतर वर्षानुवर्षे सुरू आहे.
रोजगारासोबतच शिक्षण, आरोग्य, पाणीटंचाई आणि मूलभूत नागरी सुविधांची कमतरता ही येथील दीर्घकालीन समस्या आहे. या मतदारसंघात आदिवासी बांधवांची संख्या मोठी असून, तेही कामानिमित्त आसपासच्या तालुक्यांत स्थलांतरित होतात. त्यांच्या हाताला स्थानिक स्तरावरच काम मिळावे यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले आहे. एकूणच, निजामपूर मतदारसंघातील ही निवडणूक केवळ राजकीय लढत न राहता स्थलांतर, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांवर जनतेचा कौल ठरणार आहे. आठ हजार स्थलांतरित मतदारांचा निर्णयच या निवडणुकीचा निकाल ठरवेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com