उल्हासनगर पाणीपुरवठ्याला दोन तासांचा ब्रेक
उल्हासनगरात दोन तास पाणीपुरवठा बंद
जांभूळ केंद्राचे पंपिंग थांबणार; वीज कंपनीच्या देखभाल कामाचा फटका
उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : पडघा येथील २२० केव्ही वीजवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दोन तास वीजपुरवठा खंडित होणार आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्याची साखळी विस्कळित होणार आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जांभूळ पाणी केंद्राचे पंपिंग पूर्णतः बंद राहणार असून, शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज प्रसारण कंपनीकडून २२० के. व्ही. पडघा ईएचव्ही लाइनवर तातडीचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जाईल. या दोन तासांत एमआयडीसीच्या जांभूळ केंद्रातील पंपिंग यंत्रणा ठप्प राहणार आहे.
कमी दाबाने पाणी
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर पंपिंग प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, मात्र यंत्रणा पूर्ववत होण्यास वेळ लागत असल्याने दिवसभर पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. विशेषतः पाले टॅपिंग आणि फॉरेस्ट नाका टॅपिंग परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी ओढाताण सहन करावी लागण्याची शक्यता आहे.
प्रशासनाचे आवाहन
पाणीपुरवठा विस्कळित होणार असल्याने नागरिकांनी गुरुवारीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि शुक्रवारी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी अशोक घुले यांनी केले आहे, तर पडघा लाइनवरील नियोजित वीज बंदीमुळे पंपिंग काही काळ बंद राहील. त्यानंतरही काही तास पाणीपुरवठा कमी दाबानेच राहील. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

