विवीध कारणांनी रखडली पडघ्याची नवीन पाणीपुरवठा योजना

विवीध कारणांनी रखडली पडघ्याची नवीन पाणीपुरवठा योजना

Published on

नवीन पाणीपुरवठा योजनेची रखडपट्टी
भिवंडी तालुक्यातील पडघ्यात तीव्र पाणीटंचाई

पडघा, ता. ८ (बातमीदार) : वाढत्या नागरीकरणामुळे चर्चेत आलेल्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथील नवीन पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे रखडली असून, नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
२०२३ मध्ये जलजीवन मिशनअंतर्गत जलशुद्धीकरण यंत्रणेसह १८ कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने आता पाणीटंचाईचे ग्रहण संपेल असे वाटत होते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून मोठा गाजावाजा करत योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व्हे नंबर १०१ मध्ये नवीन पाण्याच्या टाकीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. गावात चांगले रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्यात आली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा पाइपलाइन पाच्छापूर येथून पडघ्याला पाणीपुरवठा होणार होता. मात्र, आता मुंबई महापालिकेने विविध कारणे देत पडघ्याला पाणीपुरवठा करण्यास नकार दिल्याने नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णपणे रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना १९९२ मध्ये पडघा ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या योजनेमधून दूषित, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या योजनेत काही बिघाड झाल्यास आठ दिवस पाणीपुरवठ्याला मुकावे लागते, असे येथील नागरिक सांगतात.
दिवसेंदिवस पडघा गावाचे नागरीकरण होत असून, लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सध्या कार्यान्वित असलेली पाणीपुरवठा योजना अपुरी पडत आहे. पडघ्यात पाणीपुरवठा करणारी टाकीही सध्या कमी पडत असून, १५ लाइन दररोज सोडाव्या लागत आहेत.


जोडणी मिळत नसल्याने योजना रखडली
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा पाइपलाइन, पाच्छापूर येथून पाणीपुरवठा जोडणी मिळत नसल्याने ही योजना रखडली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सायली पाटील यांनी सांगितले.


नागरिकांचे हाल
सध्याची पाणीपुरवठ्याची अवस्था वाईट असून, अपुऱ्या, गढूळ, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, नवीन योजना लवकर कार्यान्वित होण्याची गरज आहे, असल्याचे ग्रामस्थ अशोक गायकवाड यांनी सांगितले.

फोटो - 189
(पडघा - विविध कारणांमुळे पडघा गावाची नवीन पाणीपुरवठा योजना अनेक दिवसांपासून रखडली आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com