पालिकेकडे चालकांचा तुटवडा; ५५ ड्रायव्हरांसाठी बेस्टकडे धाव

पालिकेकडे चालकांचा तुटवडा; ५५ ड्रायव्हरांसाठी बेस्टकडे धाव

Published on

पालिकेकडे चालकांचा तुटवडा; ५५ ड्रायव्हर्ससाठी बेस्टकडे धाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई महापालिकेत वाहनचालकांची कमतरता तीव्र झाली आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर चालक सेवानिवृत्त झाल्याने वाहने चालवण्यासाठी मनुष्यबळाची मोठी तूट निर्माण झाली आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी पालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाकडे ५५ चालकांची मागणी केली असून, बेस्टने सकारात्मक प्रतिसाद देत चालक उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने दिली.
महापालिकेत सुमारे २०० हून अधिक विभाग कार्यरत आहेत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासनामार्फत चारचाकी वाहने उपलब्ध करून दिली जातात. गेल्या काही वर्षांत वाहनांच्या मागणीत वाढ झाली असली, तरी त्यानुसार चालकांची भरती झाली नाही. सध्या पालिकेला एकूण ७८६ वाहनचालकांची गरज आहे.
वाहनचालक उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाने अन्य पर्यायांचा विचार सुरू केला आहे. खासगी चालकांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून, त्याचाच भाग म्हणून बेस्टकडे चालकांची मागणी करण्यात आली आहे. बेस्टकडून उपलब्ध होणाऱ्या चालकांचे वेतन पालिका प्रशासन देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या अडचणीच्या काळात बेस्टने मदतीचा हात पुढे केल्याने तात्पुरता दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com