टेम्पोच्या अपघातात चालक जखमी
टेम्पोच्या अपघातात चालक जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.०५ : नाशिककडून मुंबईकडे निघालेल्या टेम्पोने रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या सिमेंट दुभाजकाला धडक दिल्यानंतर तो ट्रक एका कारवर जाऊन आदळला. या अपघातात टेम्पोच्या चालक जखमी आहे. या अपघातानंतर शहरातील अंतर्गत वाहतुकीवर त्याचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे शहरातील वाहतुक गुरुवारी दुपारपर्यंत धीम्या गतीने सुरू होती.
गुरुवारी (ता. ५) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खारेगाव टोलनाका येथे कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला होता. या अपघाताने मुंबई-नाशिक महामार्ग एक तास खोंबला होता. ती वाहतुक कोंडी सुटत नाही, तोच माजीवडाजवळील रुस्तमजी इमारतीच्या समोर महामार्गावर गुरुवारी दहा वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला. अपघातात नाशिककडून मुंबईकडे निघालेला टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर तात्पुरता स्वरूपात उभारलेल्या सिमेंटच्या दुभाजकांना जाऊन धडकला. त्या धडकीनंतर तो टेम्पो उलट्या दिशेने म्हणजेच नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर येत, एका कारला जाऊन धडकून रस्त्याच्या मधोमध थांबला. त्यामुळे नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. या वाहतुकीचा फटका शहराअंतर्गत पातळीवर मोठ्या प्रमाणात बसला. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या एका बाजूला केली. अर्धा तासांहून अधिक कालावधी दोन्ही वाहने बाजूला करण्यासाठी लागल्याची माहिती वाहतुक पोलिसांनी दिली. तसेच किरकोळ जखमी झालेल्या कारचालकाचे नाव समजू शकले नाही. या वाहतुक कोंडीचा फटका दुपारी शाळेत जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना बसल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

