रिक्षाच्या धडकेत प्रवासी जखमी, एकाचा मृत्यू
रिक्षा अपघातात दोघे जखमी, तर एकाचा मृत्यू
दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घटना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ ः कल्याण-डोंबिवलीत दिवसेंदिवस बेशिस्त, मुजोर रिक्षाचालकांची संख्या वाढत असल्याचे स्थानिकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मागील दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रिक्षांनी दिलेल्या धडकेत, अपघात होऊन झालेल्या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या घटनेत रिक्षाचालकाच्या बेशिस्तीमुळे एका प्रवासी महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याचे समोर आले आहे.
मानपाडा पोलिस ठाण्यात जय प्रकाश यादव यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार रिक्षाचालक प्रभण्णा जिरोल (वय ४२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (ता. ३) रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान कल्याण-शिळफाटा हद्दीतील रस्त्यावरून प्रभण्णा हे रिक्षा प्रवासी नेत असताना घेऊन चालले असताना त्यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा वेगाने पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन आपटली. यामध्ये रिक्षातील प्रवासी आशीष चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली तर तक्रारदाराची बहीण मीनल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
दुसरी घटना कोळसेवाडी परिसरात
चिंचपाडा भागात राहणाऱ्या जान्हवी सौरे (वय २३) या रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जान्हवी या कुटंबीयांसह रिक्षेने कल्याण रेल्वे स्थानकाकडून घरी जात असताना एका दुसऱ्या रिक्षाचालकाने जान्हवी बसलेल्या रिक्षेला धडक दिल्याने जान्हवी जखमी झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

