श्रमजीवीने मोर्चा स्थगित करावा

श्रमजीवीने मोर्चा स्थगित करावा

Published on

श्रमजीवीने मोर्चा स्थगित करावा
नोंदवहीवर कार्यवाही सुरू, वाडा प्रशासनाचे आवाहन
वाडा, ता. ७ (बातमीदार) ः महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या क्षेत्र सहाय्यकांच्या संपामुळे तालुक्यातील मजुरांची उपासमार सुरू होती. याच अनुषंगाने प्रशासनाने जव्हार, विक्रमगड, वाडा येथे नोंदवहीवर कार्यवाही सुरू करताना श्रमजीवी संघटनेला मोर्चा रद्द करण्याचे आवाहन केले आहे.
वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यातील मजुरांच्या विविध प्रश्नांवर सोमवारी (ता. ९) पंचायत समिती कार्यालयावर श्रमजीवी संघटनेने मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, वाडा व विक्रमगड यांनी दिलेल्या पत्राची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. संपामुळे निर्माण झालेली तांत्रिक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ची कामे आता थेट ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामरोजगार सेवकांमार्फत पूर्ववत केली आहेत. त्यामुळे श्रमजीवीने ९ फेब्रुवारीचा मोर्चा स्थगित करावा, असे आवाहन गटविकास अधिकारी वैभव शिंदे, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी पत्राद्वारे केले आहे.
----------------------------
प्रशासकीय यंत्रणेवर लक्ष्य
श्रमजीवी संघटनेने भूमिका स्पष्ट करताना प्रत्यक्ष ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामरोजगार सेवक कशा पद्धतीने समन्वय साधतात, मजुरांना प्रत्यक्षात रोजगार कसा उपलब्ध करून दिला जातो, याचे निरीक्षण केले जाईल. प्रशासकीय यंत्रणा कशाप्रकारे काम करते, मजुरांच्या हाताला काम मिळते का, याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com