खालापूरात मतदारांचा उत्साह.

खालापूरात मतदारांचा उत्साह.

Published on

खालापुरात मतदारांचा उत्साह
१ वाजेपर्यंत मताची टक्केवारी ३५ टक्के
खालापूर, ता. ७ (बातमीदार) ः चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले असून, मतदारांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र तालुक्यात आहे. सकाळपासून मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने दुपारी १ वाजेपर्यंतच ३५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. खालापुरात चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायती समिती गणासाठी मतदान होत आहे. ५५ हजार ६७६ पुरुष मतदार, तर ५५ हजार ३०३ स्त्री मतदार असे एकूण एक लाख १० हजार ९८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी १४४ मतदान केंद्र असून, माणकिवली मतदान केंद्र हे गुलाबी असून, सर्व महिला कर्मचारी, अधिकारी निवडणूक प्रक्रिया सांभाळत आहेत.

फोटो- वयोवृद्ध मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी मदत करताना पोलिस कर्मचारी.

Marathi News Esakal
www.esakal.com