सेतू सहकाराचा

सेतू सहकाराचा

Published on

सेतू सहकाराचा
ॲड. शरदचंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

विकसकाच्या सदनिकांचे काय करावे?

प्रश्न - आमची संस्था नोंदणीकृत करण्यात आली, त्या वेळी विकसकाच्या काही सदनिका विक्री करण्याच्या शिल्लक होत्या. आता संस्था नोंदणीकृत करून चार वर्षे झाली आहेत. त्या उरलेल्या सदनिकांचे सभासदत्व कोणाकडे असते? विकसकाचे हक्क अशा सदनिकांमध्ये असतात का?
एक वाचक
उत्तर - आदर्श उपविधीमध्ये आपल्या समस्येवर उत्तर आहे. जर विक्री न झालेल्या सदनिका विकसकाच्या नावे असतील तसेच नोंदणी प्रस्तावावर त्या विक्री न झालेल्या सदनिकांच्या तपशीलासमोर विकसकाची स्वाक्षरी असेल, तर त्या सर्व सदनिकांचा सभासद हा विकसक असतो किंवा मानावा अशी स्पष्ट तरतूद उपविधी क्रमांक १७ च्या उपकलम दोन मध्ये आहे. संस्था नोंदणी होऊन चार वर्षे झाली असल्याने त्या सदनिकेचे देय शुल्क तसेच उपविधीप्रमाणे होणारी देखभाल खर्चाची देयके ही विकसकाच्या नावे काढणे आवश्यक आहे. अशी देणी देणे विकसकाला अनिवार्य असते. या विक्री न झालेल्या सर्व सदनिका या विकसकाच्या मालकीच्या असतात. तसेच विकसकाला योग्य खरेदीदार मिळाल्यास त्या विकण्याचा हक्क असतो.
विकसकाने प्रथम विक्री केलेल्या अशा सदनिकेच्या प्रथम खरेदीदाराला संस्थेने आदर्श उपविधीमधील अटी-शर्तीच्या अधीन राहून सभासदत्व देणे आवश्यक असते. अशा न विक्री झालेल्या सदनिका विकसक भाड्याने देऊ शकतो. अशा सदनिका जर विकसकाला भाड्याने द्यायच्या असल्यास आदर्श उपविधीमधील तरतुदीनुसार त्याने आवश्यक कागदपत्रे संस्थेला देणे आवश्यक असते. अशा विक्री न झालेल्या सर्व सदनिकांचे भाग दाखले हे विकसकाने मागितल्यास त्याच्या नावे देणे संस्थेला आवश्यक आहे. अशा अनेक संस्थांमध्ये अशा अनेक सदनिका असून, त्यांचे देखभाल शुल्क विकसक देत आहे.

(सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहकार कायदा यासंदर्भातील प्रश्नांसाठी कृपया खालील ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.....)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com