बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर

बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर

Published on

बेकायदा बांधकामांवर बुलडोझर
मालाडमध्ये पालिकेची कारवाई

मालाड, ता. ७ (बातमीदार) : निवडणुकांनंतर पी-उत्तर प्रभागात बेकायदा बांधकामांविरोधात पालिकेने कठोर भूमिका घेत मोठी तोडक मोहीम राबवली. पी-उत्तरचे सहाय्यक पालिका आयुक्त कुंदन वळवी आणि झोन क्रमांक ४ च्या जिल्हा दंडाधिकारी भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मार्वे रोड आणि मालाड लिंक रोड परिसरात बुलडोझरने कारवाई करण्यात आली.
प्रभाग अधिकारी कुंदन वळवी यांच्या आदेशानुसार पालिकेच्या विध्वंस पथकाने दोन स्वतंत्र पथकांमार्फत ही कारवाई केली. सहाय्यक अभियंता राजेश सोनवणे व उपअभियंता सुहास घोलप यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या पथकाने मार्वे रोडवरील साईकृपा नगर परिसरात सुमारे ४० बेकायदा बांधकामे पाडली, तर सहाय्यक अभियंता विजय मानकर व उपअभियंता प्रशांत तावडे यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या पथकाने मालाड लिंक रोडवरील वळनई परिसरात सुमारे ३० बेकायदा बांधकामे निष्कासित केली.
निवडणूक काळात अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेचा गैरफायदा घेत ही बांधकामे उभारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संयुक्त कारवाईत चार जेसीबी मशीन, ३० कामगार तसेच सुमारे १० पालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात चोक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या वेळी उपायुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले की, पी/उत्तर वॉर्डमध्ये बेकायदेशीर बांधकामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत. अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील.

फोटो - 032

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com