गोवर्धन संस्थेतर्फे मोफत महाआरोग्य शिबिर
गोवर्धन संस्थेतर्फे मोफत महाआरोग्य शिबिर
नेरूळ, ता. ७ (बातमीदार) : जुईनगर येथील स्वामी समर्थ मठ येथे श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व गोसेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात जुईनगर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅप्टर्स, डॉ. प्रताप मुदलियार व न्यू इरा हॉस्पिटल, वाशी यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह रक्तदाब, मधुमेह, बीएमआय, ईसीजी, डोळे व मोतीबिंदू तपासणी, आयुर्वेदिक सल्ला तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले. गरजू रुग्णांना मोफत औषधे, चष्मे व डाबर च्यवनप्राशचे वितरणही करण्यात आले.
चौकट
२१ वर्षांपासून आरोग्यसेवेचा उपक्रम
आमदार मंदा म्हात्रे यांनी गेल्या २१ वर्षांपासून मोफत महाआरोग्य शिबिरे सातत्याने घेतली जात असल्याचे सांगितले. या वेळी श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, जुईनगरचे अध्यक्ष संतोष सुतार, संस्थापक व सचिव प्रदीप पाटील, माजी नगरसेवक निलेश साळवे व राजू शिंदे, वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोटे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

