कपड्यांच्या दुकानात चोरी
कपड्यांच्या दुकानात शिताफीने चोरी
उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : शहरात फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, आता थेट व्यापाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. कॅम्प क्रमांक तीनमधील एका कपड्याच्या दुकानातून चोरट्याने दुकानदाराचे लक्ष विचलित करून कपडे पळविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
स्टेशन रोड, ओ.टी. सेक्शन परिसरात दीपक चौहान यांचे ‘मैंझो स्टाइल’ नावाचे कपड्याचे दुकान आहे. मंगळवारी (ता. ४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुकानदार एकटाच असताना, मास्क घातलेली एक व्यक्ती अॅक्टिव्हा दुचाकीवरून तिथे आली. त्याने कपडे खरेदी करण्याचा बहाणा करत दुकानदाराशी संवाद साधला. चोरट्याने आपली पत्नी दुकानाबाहेर उभी असल्याचे भासवले. ‘पँट पत्नीला दाखवून आणतो,’ असे सांगत त्याने दोन महागड्या लोअर पँट हातात घेतल्या आणि संधी साधताच दुचाकीवरून पळ काढला. बराच वेळ तो परतला नाही, तेव्हा फसवणूक झाल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरीचा सर्व प्रकार स्पष्टपणे दिसून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच आरोपीने शहरातील इतर भागांतही अशाच प्रकारे फसवल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

