आगीत २० मीटर बॉक्स खाक

आगीत २० मीटर बॉक्स खाक

Published on

ठाण्यात मीटर रूमला भीषण आग
ठाणे, ता. ७ : खोपट परिसरातील एका इमारतीच्या मीटर रूममध्ये लागलेल्या आगीत २० मीटर बॉक्स आणि इलेक्ट्रिक वायरिंग खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ६) संध्याकाळी घडली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. खोपट येथील प्रताप टॉकीजमागे ‘गणेश व्हिला’ ही तळ अधिक चार मजल्यांची इमारत आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या बी-१ विंगमधील मीटर रूममध्ये अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट पसरल्याने रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आले होते. सुमारे ३० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com