परीक्षार्थ्यांसाठी वाहतूक विभाग सज्ज

परीक्षार्थ्यांसाठी वाहतूक विभाग सज्ज

Published on

परीक्षार्थींसाठी वाहतूक विभाग सज्ज
विद्यार्थ्यांसाठी १२ विशेष बाइक रायडर्स तैनात

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ ः कल्याण-डोंबिवली शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे व वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह दहावी-बारावीच्या परीक्षार्थींनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा परीक्षार्थी वाहतूक कोंडीत अडकून वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकत नसल्याच्या घटना घडत असल्याने, विद्यार्थ्यांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी शहर वाहतूक विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने १२ विशेष बाइक रायडर्स तैनात करण्यात आले आहेत.
लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार असून, यासाठी कल्याण-डोंबिवली शहर वाहतूक विभागाच्या वतीने १२ विशेष बाइक रायडर्स तैनात करण्यात आले आहेत. विद्यार्थी कुठेही ट्रॅफिकमध्ये अडकल्यास त्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास संबंधित भागातील बाइक रायडर विद्यार्थ्याला त्या ठिकाणाहून परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवेल, अशी माहिती डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी दिली. या विशेष नियोजनाअंतर्गत कल्याणमध्ये चार, डोंबिवलीत चार आणि शिळफाटा परिसरात चार असे एकूण १२ बाइक रायडर्स विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहेत. तसेच परीक्षा केंद्रांच्या आसपास वाहतूक सुरळीत रहावी यासाठी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिस व अंमलदारांची नियोजनबद्ध नेमणूक करण्यात आली आहे.

------------------
चौकट
- हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन
वाहतूक पोलिसांनी पालक व वाहनचालकांना आवाहन केले आहे की, परीक्षेच्या वेळेत अनावश्यक वाहनांची गर्दी टाळावी. शाळा व कॉलेज परिसरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि हॉर्नचा अनावश्यक वापर करू नये. विद्यार्थ्यांनीही वेळेआधी घरातून निघून वाहतुकीच्या परिस्थितीचा अंदाज घेणे गरजेचे आहे. तसेच दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी महिन्यात असून, या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ठाणे पोलिस आयुक्त व पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन राबवण्यात आले आहे. तसेच ८६५५६५४१८४ हा कल्याण-डोंबिवली शहर वाहतूक विभाग हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी तथा डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे प्रमुख श्रीराम पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com