एक स्वीकृत नगरसेवक देण्याची मनसेची मागणी

एक स्वीकृत नगरसेवक देण्याची मनसेची मागणी

Published on

एक स्वीकृत नगरसेवक देण्याची मनसेची मागणी
प्रभादेवी, ता. ७ : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोट्यातून मनसेला एक स्वीकृत नगरसेवक मिळावा, अशी मागणी मनसेचे गटनेते नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. मुंबई महापालिकेकडे यावर्षी १० स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. संख्याबळानुसार भाजपला चार, शिंदे गटाला दोन, उद्धव ठाकरे यांना तीन आणि काँग्रेसला एक असे संख्याबळ असणार आहे. संख्याबळनुसार मनसेला उद्धव ठाकरे गटातून एक स्वीकृत नगरसेवक देण्यात यावा, अशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे, भावना आहे. ही भावना आम्ही मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. आता दोघेही ठाकरे बंधू यावर निर्णय घेतील, असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. दरम्यान, यावर्षी मराठी भाषादीनही मोठ्या उत्साहात शिवाजी पार्क मैदानात साजरा करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com