स्लिप पोच

स्लिप पोच

Published on

चेंढरेत मतदारांचा खोळंबा
स्लिप न मिळाल्याने केंद्रावर उडाला गोंधळ
अलिबाग ः तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान पार पडले. मतदान सुरळीत व्हावे म्हणून प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. परंतु, चेंढरे येथिल मतदान केंद्रावर मतदान स्लिप न मिळाल्याने बीएलओच्या बूथवर मतदारांनी मतदान क्रमांक आणि बूथ क्रमांक शोधण्यासाठी गर्दी केली होती.
प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सुरळीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून प्रशासन विविध उपाययोजना राबवित असते. प्रत्येक मतदाराच्या घरी ग्रामपंचायत कर्मचारी किंवा बीएलओ मार्फत मतदारांचा मतदान केंद्र, फोटो असलेली मतदान क्रमांकची स्लिप दिली जाते. परंतु, या निवडणुकीत त्याचा अभाव दिसून आला. चेंढरे जिल्हा परिषद गटात मतदार स्लिप न मिळाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. सकाळी चेंढरे येथील मराठी शाळेच्या केंद्रावर मतदारांचा मतदान केंद्र आणि क्रमांक शोधण्यासाठी बीएलओच्या टेबलसमोर गर्दी केली होती.

मागील काही निवडणुकीवेळी शासनाकडून मतदान केंद्र, क्रमांक, फोटो असलेली स्लिप घरपोच आली होती. परंतु, या निवडणुकीवेळी अशी स्लिप न मिळाल्याने, मतदान केंद्रावर जाऊन केंद्र आणि क्रमांक शोधावे लागले. त्यामुळे एक तास मतदान करण्यासाठी गेला.
- जितेंद्र नरेंद्र मेहता, मतदार, चेंढरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com