ज्वलनशील पदार्थ फेकून 
भररस्त्यात तरुणाला लुटले

ज्वलनशील पदार्थ फेकून भररस्त्यात तरुणाला लुटले

Published on

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : कोपरखैरणे येथील बोनकोडे परिसरात एका २१ वर्षीय तरुणावर दोघा लुटारूंनी ॲसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकून त्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरखैरणेतील बोनकोडे परिसरात राहणारा तय्यब मारुफ खान (वय २१) हा तरुण बुधवारी (ता. ४) रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास सेक्टर १२ मधील नाल्याशेजारील सार्वजनिक शौचालयातून बाहेर पडून पदपथावरून चालत जात होता. याच वेळी दोन व्यक्तींनी त्याला गाठले. काही समजण्याच्या आतच त्या लुटारूंनी त्यांच्याजवळील पांढऱ्या बाटलीतून ॲसिडसारखा ज्वलनशील द्रव पदार्थ तय्यबच्या अंगावर फेकला. अंगाची आग होत असताना आणि तय्यब वेदनेने विव्हळत असतानाच, लुटारूंनी त्याच्या खिशातील मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांनी अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. या हल्ल्यात तय्यबचा चेहरा, हात आणि पोटाचा भाग भाजला आहे. जखमी तय्यबने तातडीने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोपरखैरणे पोलिस तक्रार नोंदवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com