अलिबाग जिल्हा न्यायालयात ई-सेवा केंद्राचे उद्घाटन

अलिबाग जिल्हा न्यायालयात ई-सेवा केंद्राचे उद्घाटन
Published on

अलिबाग जिल्हा न्यायालयात ई-सेवा केंद्राचे उद्‍घाटन
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात शुक्रवारी (ता. ६) सकाळी नवीन ई-सेवा केंद्राचे उद्‍घाटन जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नव्याने सुरू करण्यात आलेल्या नक्कल शाखेचेही उद्‍घाटन करण्यात आले. या नक्कल शाखेमुळे जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयातील नक्कल कामकाज अधिक जलद व सुलभ होणार आहे.
ई-सेवा केंद्रामुळे पक्षकार, वकील व नागरिकांना खटल्याची स्थिती, पुढील सुनावणीची तारीख, ऑनलाइन अर्ज, कागदपत्रांचे स्कॅनिंग, ई-स्वाक्षरी, ई-स्टॅम्प पेपर्स, ई-कोर्ट मोबाईल ॲपची माहिती तसेच बंदींना नातेवाइकांसोबत ई-मुलाखतीसाठी सहाय्य अशा विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता व गती वाढेल.

चौकट
वेळ व खर्चात बचत
ई-सेवा केंद्रामुळे नागरिकांना विविध न्यायालयीन कामांसाठी वेगवेगळ्या कक्षांमध्ये फेरफटका मारावा लागणार नाही. एकाच ठिकाणी अनेक सेवा उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च व कागदपत्रांची झंझट कमी होऊन न्यायप्रक्रिया अधिक सुलभ व लोकाभिमुख होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com