रोहा तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार

रोहा तालुक्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार

Published on

रोहा तालुक्यात महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा अधिक
रोहा, ता. ७ (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांमध्ये मंगळवारी शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला असून, महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनीही लोकशाहीच्या या महापर्वात सक्रिय सहभाग नोंदवला.
रोहा तालुक्यात सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत एकूण २७ टक्के मतदान झाले होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढून ४३ टक्क्यांवर पोहोचला. रोहा तालुक्यातील नागोठणे, आंबेवाडी, भुवनेश्वर व घोसाळे या चार जिल्हा परिषद गटांमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण सुमारे ५६ टक्के मतदान नोंदविण्यात आले. ‘लाडक्या बहिणी’ योजनेंतर्गत महिलांचा वाढता प्रतिसाद मतदान केंद्रांवर प्रकर्षाने जाणवत होता.
राजकीय लढतीच्या दृष्टीने नागोठणे, आंबेवाडी व भुवनेश्वर जिल्हा परिषद गटांत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट अटीतटीची लढत पाहायला मिळाली, तर घोसाळे गटात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शेकाप या प्रमुख पक्षांमध्ये चुरशीची लढत रंगली. विशेषतः या गटात मुंबईकर मतदारांचा कल कोणाच्या पारड्यात गेला, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता असून, त्याचे चित्र सोमवारच्या (ता. ९) मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.
एकूणच रोहा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांमध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता, प्रशासनाच्या काटेकोर नियोजनाखाली शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या प्रक्रियेत मतदारांचा वाढता सहभाग भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी सकारात्मक संकेत देणारा ठरत आहे.

फोटो कॅप्शन: मतदानाचा हक्क बजावताना नवमतदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com