अवजड वाहन अडकल्याने तासभर कोंडी
विटावा सबवेखाली अवजड वाहन अडकले
दोन तास वाहतूक ठप्प
कळवा, ता. ७ (बातमीदार) : विटावा रेल्वे सबवेखाली उंचीचा अंदाज न आल्याने शनिवारी सकाळी ६च्या सुमारास एक अवजड वाहन अडकले. या घटनेमुळे ठाणे-बेलापूर मार्गावर मनीषा नगर ते पटणी मैदानापर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. याचा मोठा फटका कामावर जाणारे नोकरदार, प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांना बसला असून, संताप व्यक्त केला जात आहे.
विटावा सबवेच्या सुरक्षेसाठी रेल्वेने उभारलेली लोखंडी कमान गेल्या दोन महिन्यांपासून तुटलेली आहे. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही तिची दुरुस्ती झालेली नाही. दुसरीकडे, नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून विटावा जकात नाका परिसरात नवीन कमान उभारण्यास विलंब होत आहे. याच संधीचा फायदा घेत अवजड वाहने टोल वाचवण्यासाठी गुगल मॅपच्या साह्याने पहाटे या मार्गाचा वापर करतात आणि पुलाखाली अडकतात.
शनिवारी सकाळी झालेल्या या कोंडीमुळे दोन तास वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे प्रशासन आणि वाहतूक विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने ही समस्या कायम आहे. पटणी मैदानाजवळ आणि कळवा बाजूला अधिक मजबूत कमानी उभारण्याची मागणी केली आहे. लवकरच यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून कोंडीवर नियंत्रण मिळवू, अशी प्रतिक्रिया विटावा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

