आयुष्यवर कौतुकाचा वर्षाव

आयुष्यवर कौतुकाचा वर्षाव

Published on

आयुषवर कौतुकाचा वर्षाव
आमदार, महापौरांकडून कुटुंबीयांचे अभिनंदन
विरार, ता. ८ (बातमीदार) ः वसई-विरारच्या प्रथम नागरिक महापौर अजीव पाटील यांनी विश्वविजेता संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी जाऊन त्याचे कौतुक केले. तर वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनीदेखील कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे.
भारताच्या अंडर-१९ संघाने इंग्लंडवर विजय मिळवून सहाव्यांदा विश्वचषकाचा मानकरी ठरला. वसईचा आयुष म्हात्रे संघाचा कर्णधार असल्याने त्याच्या घरच्यांचेही कौतुक होत आहे. वसई-विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी शनिवारी (ता. ७) आयुषच्या कुटुंबीयांची भेट घेऊन भारताच्या विजयातील त्याच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. तसेच त्याच्या क्रिकेटमधील जडणघडणीत मोठे योगदान असलेल्या आजोबांशी संवाद साधला. तर वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी आमच्या वसईकर आयुष म्हात्रेचा अभिमान असल्याचे आवर्जून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com