रेल्वे कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन चोरीला
रेल्वे कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कळवा कारशेड येथे कर्तव्यावर असताना चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बदलापूर येथे राहणारे भरत जगन्नाथ वाडाळकर (वय ५९) हे कळवा कारशेड (भारतीय रेल्वे) येथे कार्यरत असून, ६ फेब्रुवारीला सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कळवा कारशेड येथे कर्तव्यावर होते. याचदरम्यान, दुपारी सुमारे ३.३० वाजता त्यांनी मोबाईल फोन कारपेंटर सेक्शनमध्ये चार्जिंगला लावला होता. त्यानंतर आपले कर्तव्य बजावण्यासाठी ते बाहेर गेले असता सुमारे ३.४५ वाजता परत आल्यानंतर चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन तेथे आढळून आला नाही. त्यानंतर त्यांनी त्या परिसरात व सहकाऱ्यांकडे शोध घेतला; मात्र मोबाईल सापडला नाही. सहकाऱ्यांच्या मोबाईलवरून स्वतःच्या नंबरवर संपर्क साधला असता फोन बंद असल्याचे निदर्शनास आले, तर चोरीला गेलेला मोबाईल फोनची किमत १३ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा अनोळखी चोरट्याविरोधात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

