पालिका निवडणुकीच्या नावाखाली गंडा

पालिका निवडणुकीच्या नावाखाली गंडा
Published on

पालिका निवडणुकीच्या नावाखाली गंडा
सराफाकडे बनावट सोने तारण, २८ लाखांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ ः बदलापूर पालिका निवडणुकीत आई उभी असल्याने तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगत बदलापूर येथील एका तरुणाने डोंबिवलीतील सराफाची तब्बल २८ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
जुन्या डोंबिवलीच्या खंडोबा मंदिराजवळ ‘राधे गोल्ड आर्ट्स’ नावाचे सोने-चांदी विक्री, तारण ठेवण्याचे दुकान आहे. बांधकाम क्षेत्रातील मित्र मोंटू राच यांच्या मदतीने सोने तारण ठेवून रक्कम देण्याचा व्यवसाय करतात. डिसेंबरमध्ये प्रवीण पाटील नावाचा तरुण पोरिया यांच्या दुकानात आला. त्याने बदलापूर येथे पालिका निवडणुकीसाठी आई उमेदवार असल्याचे सांगत निवडणुकीसाठी पैशांची तातडीची गरज असल्याचे कारण दिले होते. त्यासाठी सोन्याचे दागिने तारण ठेवण्याची तयारी दर्शवली होती. पाटील याने सुरुवातीला १४ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी तारण ठेवली. त्यानंतर २८१ ग्रॅम वजनाचे २८ लाख रुपये किमतीचे दागिने तारण ठेवले होते. दरम्यान, तारण ठेवलेले सोने खरे आहे का, याची तपासणी पोरिया यांनी केली असता दागिने पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com