‘ग्लॅडिओलस’च्या रंगांची उधळण

‘ग्लॅडिओलस’च्या रंगांची उधळण

Published on

‘ग्लॅडिओलस’च्या रंगांची उधळण
कोसबाडातील केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर लागवड
वाणगाव, ता. ८ (बातमीदार) : कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक शेतीसाठी कार्यरत आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात ऑर्किड, मोगरा, झेंडूच्या शेतीबरोबर कोसबाड येथे ग्लॅडीओलस फुलांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे.
ग्लॅडिओलस रब्बी हंगामातील पीक आहे. कडक उन्हाळा, पावसाचा काळ वगळता वर्षभर त्याची लागवड करता येते. ग्लॅडिओलस पिकात फुलाला आकर्षक रंग महत्त्वाचे असते. यासाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान असणे गरजेचे असते. या तापमानात पिकाची वाढ चांगली होते. पिकाच्या वाढीसाठी थंड, कोरडे आणि कमी पावसाचे हवामान अनुकूल असते. पालघर जिल्ह्यातील अनुकूल वातावरणबरोबर आता मुंबईसारख्या बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने कमी कालावधीत अधिक उत्पन्नासाठी फुलांची लागवड फायदेशीर ठरते.
----------------------------------
सजावटीसाठी वापर
लांब दांड्याच्या फुलांमध्ये ग्लॅडिओलस महत्त्वाचे व्यापारी फुलपीक आहे. दांड्यावर उमलत जाणारी आकर्षक फुले पिकाचे खास वैशिष्ट्य. अनेक रंगछटा, प्रामुख्याने गुच्छ तयार करण्यासाठीस सजावटीसाठी वर्षभर फुलाला मागणी असते. सरी वरंब्यावर ४५ बाय १५ सेंमी अंतरावर कंदांची लागवड करावी. काही ठिकाणी सपाट वाफ्यातही ३० बाय २० सेंमी अंतरावर लागवड केली जाते.
-----------------------------
लागवडीची पद्धत
- लागवडीसाठी कंदांची निवड करणे महत्त्वाचे आहे. त्यावरच उत्पादन अवलंबून असते. सारख्या आकाराचे दोन ते तीन इंच व्यासाचे ३० ते ३५ ग्रॅम वजनाचे निरोगी कंद निवडावे. हे कंद शीतगृहात तीन महिने पूर्ण विश्रांती दिलेले असावेत.
- व्यवस्थापनातून प्रतिहेक्‍टर क्षेत्रातून दीड लाख ते अडीच लाख फुलदांडे मिळतात. प्रतवारीनुसार प्रति १२ फुलदाड्यांची एक जुडी बांधून कागदात गुंडाळून बांबूच्या अथवा कागदी खोक्‍यात पॅक करावी. त्यानंतर ही फुले विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावीत.
-----------------------------
ग्लॅडिओलस व्यापारीदृष्ट्या फायदेशीर फुलपीक मानले जाते. योग्य नियोजन, टप्प्याटप्प्याने लागवड, बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पादन घेतल्यास चांगला नफा मिळू शकतो. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.
- डॉ. विलास जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com