कल्याणमध्ये काँग्रेसचा ''चक्का जाम''

कल्याणमध्ये काँग्रेसचा ''चक्का जाम''

Published on

कल्याणमध्ये काँग्रेसचा ‘चक्का जाम’
एपस्टीन फाइल्स प्रकरणावरून पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी
​कल्याण, ता. ८ (बातमीदार) : जगभरात खळबळ माजवणाऱ्या ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकरणाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. या मुद्द्यावरून कल्याणमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता. ७) कल्याण पश्चिम येथे जोरदार घोषणाबाजी आणि ‘चक्का जाम’ आंदोलन केले.
​कल्याण पश्चिमेतील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी हातात फलक घेतले होते, ज्यावर ‘एपस्टीन-मोदी, भाई-भाई’ यांसारखे आक्षेपार्ह मजकूर असलेले पोस्टर्स झळकत होते. या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
​आंदोलन अधिक तीव्र करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आणि ‘चक्का जाम’ करण्याचा प्रयत्न केला. यामुळे भरचौकातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती, परिणामी वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलक आक्रमक पवित्रा घेत असल्याचे पाहून पोलिसांनी अनेक प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि रस्ता मोकळा केला.
​या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ‘झपाटलेला’ या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील ‘तात्या विंचू’ या पात्राच्या वेशभूषेत एक आंदोलक सहभागी झाला होता. हातात आंदोलनाचे फलक घेऊन उभा असलेला हा ‘तात्या विंचू’ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com