प्रदूषणाविरोधात ‘दंड’ थोपटले

प्रदूषणाविरोधात ‘दंड’ थोपटले

Published on

प्रदूषणाविरोधात ‘दंड’ थोपटले
ठाण्यात बांधकाम, वाहने, कचरा समस्या कायम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार, केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वर्षभरापासून प्रदूषणाचे हॉटस्पॉट पालिकेने शोधले आहेत. मात्र, वाहनांची कोंडी, बांधकामांची धूळ, कचरा जाळपोळीमुळे शहरातील वायू प्रदूषण वाढल्याचे पालिकेच्या अहवाल नमूद आहे. त्यामुळे ठाणेकरांची प्रदूषणातून सुटकेसाठी पुन्हा दंड थोपटण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
‘स्मार्ट सिटी’कडे झेप घेणाऱ्या ठाणे शहराच्या प्रदूषणामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. दमा, श्वसनाचे आजार वाढत असल्याने ठाणे पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी व्यापक मोहीम उभारली आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षात हवेच्या प्रदूषण नियंत्रणासाठी २३९.०६ कोटींची तरतूद करण्यात आली असून, या निधीतून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आली आहे. शहरातील बांधकाम, पाडकामातील कचऱ्यावर नजर ठेवण्यासाठी कांदळवन परिसरासह शहरातील संवेदनशील भागांमध्ये १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. शिवाय शहरात ३०० टन प्रतिदिन क्षमतेचा बांधकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित असून, वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन केले जात आहे. तसेच हवेच्या गुणवत्तेवर नजर ठेवण्यासाठी २२० लो-कॉस्ट सेन्सर्स विविध भागांत बसवले आहेत, तर ३० हॉटस्पॉट्सपैकी काही ठिकाणी २५ सेन्सर्स कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे प्रदूषणाची पातळी तपासणे शक्य झाले असून, प्रदूषणाला कारणीभूत घटकांच्या अभ्यासावर पालिकेने भर दिला आहे.
-------------------------------------
दंडात्मक वसुली
१- बांधकाम व्यावसायिकांकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पालिकेने ३५० नोटिसा बजावल्या आहेत. १ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत १८२ ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यापैकी १२२ ठिकाणी कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या, तर ५९ ठिकाणी थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून २८ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
२- उघड्यावर कचरा जाळण्याच्या घटनांवरही महापालिकेने कडक भूमिका घेतली आहे. १ एप्रिल २०२५ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत १० प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी तीन प्रकरणांत १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
३ - बांधकामस्थळांवर धूळ नियंत्रणाचे उपाय न केल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १२४ बांधकामस्थळांवर कारवाई करून ४३ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
४ - सिंगल यूज प्लॅस्टिकविरोधी मोहिमेअंतर्गत १,३२३.२ किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त. चार लाख ९४ हजार ६०० रुपयांचा दंड आकारला.
५ - आरटीओ विभागाकडून ९४ कोंडीग्रस्त रस्त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी २६ प्रमुख रस्त्यांवर गस्त घालण्यात येत आहे. पीयुसी तपासणीत २४,१९३ अधिक वाहने दोषी आढळले असून २४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
----------------------------------
कृती आराखड्याची अंमलबजावणी
- शहरातील ३० प्रदूषणाच्या ठिकाणांवर आयआयटी संस्थेच्या सहकार्याने सविस्तर कृती आराखडा.
- वर्षभरात एक लाख नऊ हजार झाडे लावली आहेत. सात हजार बांबूंच्या झाडांचा समावेश आहे. मियावाकी पद्धतीने ८० हजार झाडांची लागवड.
- माजिवडा, विटावा चौकांमध्ये धूळ नियंत्रणासाठी मिस्ट वॉटर फाउंटन.
- ७२७ रस्ते खड्डेमुक्त ठेवताना दररोज पाण्याचा मारा.
- ४० पैकी आठ स्मशानभूमी एलपीजी, पीएनजी बसवले असून, नऊ स्मशानभूमी पर्यावरणपूरक.
- ११७ पैकी २७ बेकऱ्यांमध्ये गॅस, विजेचा वापर.
- ठाणे पालिका क्षेत्रामध्ये वर्षभरात ४४ तक्रारी आल्या होत्या. कारवाईत दोन लाख २० हजारांचा दंड वसूल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com