कल्याण-डोंबिवलीत साकारणार ''ऑटिझम व्हिलेज''

कल्याण-डोंबिवलीत साकारणार ''ऑटिझम व्हिलेज''

Published on

कल्याण-डोंबिवलीत साकारणार ‘ऑटिझम व्हिलेज’
२ एप्रिलला लोकार्पण; जागतिक दर्जाच्या उद्यानाची रचना
​कल्याण, ता. ८ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिका क्षेत्रातील बारावे रिंग रोड लगत परिसरात सुमारे १२,७७२ चौरस मीटर क्षेत्रफळावर ‘ऑटिझम व्हिलेज’ आणि सुसज्ज उद्यान साकारण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली असून, येत्या २ एप्रिल रोजी ‘जागतिक ऑटिझम जागरूकता दिनी’ या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वमग्नता असलेल्या मुलांच्या विकासासाठी आखलेली विशेष रचना हे या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
​या सुविधेमुळे केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे, तर संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील ऑटिझमग्रस्त मुलांना मोठा आधार मिळणार आहे. ​एका बाजूला ऑटिझम व्हिलेज असताना, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांसाठी जागतिक दर्जाचे उद्यान विकसित केले जात आहे.
​हा प्रकल्प ‘मेरे रिअल्टी’ या विकासकामार्फत ‘ॲमेनिटी टीडीआर’च्या माध्यमातून साकारला जात आहे. कामाचा दर्जा राखून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी दर आठवड्याला पाहणी केली जाईल, असे आयुक्तांनी कामाचा आढावा घेताना स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यावेळी नगररचना संचालक संतोष डोईफोडे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, विकासक सुदेश मोर्यानी, जय लालवानी, सुनील पुनेजा, दिलीप पाठारे आणि कन्सल्टंट सूरज पाटील उपस्थित होते.

व्हिलेजमधील सुविधा ः
१) ​सेन्सरी पाथवे आणि गार्डन : विविध स्पर्शांची जाणीव करून देणारे मार्ग.
२) ​थेरपी सेंटर : मुलांवरील उपचारांसाठी तज्ज्ञ केंद्र.
३) ​मेडिटेशन सेंटर : मुलांच्या मानसिक शांततेसाठी विशेष जागा.
४) ​सेन्सरी प्ले इक्विपमेंट्स : खेळाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक विकास साधणारी उपकरणे.

उद्यानातील सोयी ः
​- खेळ आणि व्यायाम : बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक.
-​ निसर्ग आणि मनोरंजन : मियावाकी जंगल, आधुनिक कारंजे आणि भव्य ॲम्फीथिएटर.
​- इतर सुविधा : कॅफेटेरिया, सौरऊर्जा यंत्रणा आणि स्वच्छतागृहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com