ठाणे थोडक्यात बातम्या
ठाणे थोडक्यात बातम्या
विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लंपास
ठाणे : सीएसएमटी ते ठाणे लोकल प्रवासादरम्यान पाचपाखाडी येथे राहणाऱ्या श्रुती पालशेतकर या विद्यार्थिनीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ती एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६.५५ वाजता ती अंबरनाथहून महिलांच्या डब्यातून प्रवास करून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर उतरली. त्यानंतर सीएसएमटी बाजूकडील ब्रिज चढून फलाट क्रमांक एककडे जात असताना सुमारे ७.०२ वाजता तिच्या बॅगेची चेन उघडी असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर बॅग तपासली असता, त्यात ठेवलेला ४४ हजार ९९९ रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याचे निर्दशनास आल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास लोहमार्ग पोलिस करत आहेत.
.................
मेमोमधून प्रवासादरम्यान मोबाईल चोरी
ठाणे : न्हावडे येथून कामावरून घरी परतत असताना रेल्वे प्रवासादरम्यान डोंबिवली पूर्व येथील समीर बावकर (वय २२) या तरुणाचा मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता पेण-दिवा मेमोमध्ये घडली. तक्रारदार हे ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता न्हावडे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ०१/०२ वरून आलेल्या पेण-दिवा मेमोच्या गार्डबाजूकडील जनरल डब्यात चढले. प्रवाशांची गर्दी असल्याने ते दरवाजाजवळ उभे राहून मोबाईल फोन वापरत प्रवास करत होते. दरम्यान, मेमो आगासन रेल्वे फाटक ओलांडत असताना सहप्रवाशाचा धक्का लागल्याने त्यांच्या हातातील मोबाईल फोन खाली पडल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मोबाईलवरून स्वतःच्या नंबरवर संपर्क साधला असता, एकदा रिंग जाऊन फोन बंद लागल्याचे निदर्शनास आले. यावरून गर्दीचा फायदा घेत अनोळखी चोरट्याने १५ हजार रुपये किमतीचा लांबवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
......
लोकलमध्ये विद्यार्थ्याचा मोबाईल चोरीला
ठाणे : घाटकोपर ते ठाणे लोकल प्रवासादरम्यान एका अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या कळवा, पारसिकनगर येथील भावेश पाटील (वय १८) या विद्यार्थ्याचा मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा ६ फेब्रुवारी रोजी कॉलेज सुटल्यानंतर अंधेरी येथून मेट्रोने घाटकोपर येथे आला आणि तेथून घाटकोपर ते ठाणे प्रवासासाठी लोकलने जाण्यासाठी रात्री सुमारे ११.०० वाजता घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ०१ वरून आलेल्या कल्याण धिम्या लोकलच्या गार्डबाजूकडील पुरुष जनरल डब्यात चढला. डब्यात प्रचंड गर्दीत उभे राहून प्रवास करत असताना त्याने आपला मोबाईल पँटच्या उजव्या खिशात ठेवला होता. लोकल रात्री सुमारे ११.३० वाजता ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर येऊन थांबल्यानंतर तो प्रवाशांच्या गर्दीतून खाली उतरला. त्या वेळी मोबाईल फोन खिशात नसल्याचे त्याच्या लक्षात आले. सहप्रवाशाच्या मोबाईलवरून स्वतःच्या मोबाईलवर संपर्क साधला असता फोन बंद असल्याचे आढळून आले. चोरीस गेलेला मोबाईल फोन अंदाजे १९ हजार ३८९ रुपये किमतीचा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

