सौर पथदिव्यांची मागणी
सौर पथदिव्यांची मागणी
बदलापूर, ता. ८ (बातमीदार) : बदलापूर शहरातील मुख्य रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी सौरऊर्जेवरील पथदिवे बसवावेत, अशी मागणी समाजसेवक हर्षद भोपी यांनी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांच्याकडे केली आहे. सध्या संपूर्ण जग ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणासाठी सौरऊर्जेचा स्वीकार करत असून, केंद्र व महाराष्ट्र शासनही विविध योजनांद्वारे सौरऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. अशा परिस्थितीत बदलापूर नगर परिषदेने आधुनिकतेची कास धरून सौर पथदिव्यांचा अवलंब करणे, ही काळाची गरज असल्याचे भोपी म्हणाले.
शहरातील रस्ते व पदपथांवर सौर पथदिवे बसवल्यास वीजपुरवठा खंडित झाला तरी अखंड प्रकाश उपलब्ध राहणार आहे. सौरऊर्जा प्रदूषणमुक्त असल्यामुळे बदलापूरला ‘हरित शहर’ म्हणून नवी ओळख मिळू शकते. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे सौरदिवे दीर्घकाळ टिकणारे असून त्यांचा देखभाल खर्चही तुलनेने कमी असतो. विजेच्या बिलातून होणारी बचत शहरातील इतर विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरी सोयी-सुविधांसाठी वापरता येईल, असेही भोपी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

