वाहतूक कोंडीचे बाळकुम केंद्र
वाहतूक कोंडीचे बाळकुम केंद्र
आमदार संजय केळकर यांच्याकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : बाळकुम परिसरातील भव्य गृहसंकुलांमुळे वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत वाहतूक व्यवस्था नसल्याने आमदार संजय केळकर यांनी नुकतीच या परिसराची पाहणी केली होती. या वेळी वाहतूक शाखा, पालिका, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.
पिरामल वैकुंठ, दोस्ती वेस्ट काऊंटी, रुणवाल गार्डन सिटी, कल्पतरू, लोढा अमारासारख्या मोठ्या गृहसंकुलांमुळे बाळकुम परिसराचा विस्तार झाला आहे; मात्र वाढलेल्या लोकसंख्येसाठी आवश्यक असलेली रस्ते व्यवस्था, पादचारी सुविधा आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा अपुरी ठरत आहे. याचा थेट फटका वाहनचालकांसह पादचाऱ्यांना बसत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जुना मुंबई-आग्रा मार्गाच्या दोन्ही बाजूंना शाळा असून बाळकुम पाडा एक येथे पालिकेचे आरोग्य केंद्र, प्रसूतिगृह आहे. त्यामुळे गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याने परिसरात सिग्नल यंत्रणा बसवणे, रस्ता रुंदीकरण, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपायांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
-----------------------------
९० टक्के काम पूर्ण
बाळकुम पाडा एक ते शिवाजीनगर नाका येथील पादचारी पुलाचे काम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे; मात्र पुलावर वेदर शेड उभारणे तसेच पुलाचा जिना सोनुबाई मंदिर परिसरात उतरवण्याची मागणी होती. त्यानुसार ही कामे करण्याचे आश्वासन एमएमआरडीए अभियंता पाटील यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

