७०२ हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी

७०२ हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी

Published on

७०२ हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी
भिवंडीत विशेष लसीकरण मोहीम

भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : हज यात्रा ही मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र अशी यात्रा मानली जाते. तेथे जाण्यापूर्वी हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी व्हावी, त्यांना रोगप्रतिकारक लस देण्यात यावी याकरिता भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेचा आतापर्यंत ७०२ हज यात्रेकरूंनी लाभ घेतला. आणखी दोन दिवस हे लसीकरण सुरू राहणार असून, तोपर्यंत आणखी साधारण ३०० यात्रेकरू लाभ घेतील अशी माहिती फार्मसिस्ट आसिफ अन्सारी यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात अशा पद्धतीने लसीकरण फक्त भिवंडीत मागील चार वर्षांपासून उपलब्ध करून दिले जात आहे. भिवंडी ग्रामीण, कल्याण, मुंब्रा, ठाणे येथील हज यात्रेकरूंनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. वैद्यकीय अधिकारी डॉ. आयेशा, पंकज सिंह, राजश्री दाभाडे यांसह परिचारिका यांनी ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

फोटो - 229

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com