पोलिस भरतीकडे तरुणांचा कल
पालघर (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील पोलिस पदाच्या १७५ जागांसाठी ९,१०१ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या भरतीसाठीची मैदान चाचणी बुधवार (ता. ११) ते बुधवार (ता. २५)दरम्यान जिल्ह्यातील कोळगाव येथील पोलिस परेड मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच अन्य ठिकाणाहून येणाऱ्या पोलिस भरतीच्या उमेदवारांच्या सोयीसाठी पालघर रेल्वे, एसटी स्थानक येथे पोलिस भरती हेल्प डेस्क मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच पालघर रेल्वे स्थानक, बस स्थानकावर उमेदवारांसाठी सूचनांचे फलक लावण्यात आलेले आहे. पालघर जिल्हा पोलिस दलाकडून लांबून येणाऱ्या उमेदवारासाठी पालघरच्या हुतात्मा चौकाजवळील अंबा माता मंदिर येथील सभागृहात महिला उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था केली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

