‘ब्लॅक थ्रिप्स’चे मिरचीवर संकट

‘ब्लॅक थ्रिप्स’चे मिरचीवर संकट

Published on

‘ब्लॅक थ्रिप्स’चे मिरचीवर संकट
पालघर जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतित
वाणगाव, ता. ९ (बातमीदार) : पालघरसह चिंचणी, वाणगाव, डहाणू परिसरातील मिरचीवर ब्लॅक थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे परिसरातील ५०० पेक्षा जास्त छोटे-मोठे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेती संकटात आल्याने प्रंपचच संकटात आला आहे.
ब्लॅक थ्रीप्स पानांच्या पालवीवर जगत असतो. त्यामुळे मार्चनंतर झाडांना पालवी राहत नसल्याने कीडनाशकांनी ब्लॅक थ्रिप्स आटोक्यात येतो, परंतु मिरचीची पहिली तोडणी जानेवारीत होत असल्याने त्याच काळात ब्लॅक थ्रिप्सने शिरकाव केल्याने आर्थिक नुकसानीचा धोका वाढला आहे. कृषी विभागाने ब्लॅक थ्रिप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत, पण हजारो हेक्टरवरील मिरची लागवड संकटात येण्याचे डहाणूतील मिरची उत्पादक शेतकरी मिलिंद मर्दे यांनी सांगितले.
---------------------------
पीक उपटण्याची वेळ
गेल्या वर्षी जानेवारीत ब्लॅक थ्रिप्स प्रादुर्भाव वाढल्याने गुंतवणूक केलेला खर्चदेखील मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उपटून टाकले होते. डहाणू तालुक्यातील वनकास येथील ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने झेंडूसारख्या पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षीही गेल्या वर्षाप्रमाणेच स्थिती उद्भवू नये, यासाठी कृषी विभागाने वेळीच हालचाली करणे आवश्यक आहे.
-----------------------
फुलकळीमध्ये वावर
ब्लॅक थ्रिप्सचा वावर फुलकळीमध्ये असल्याने ब्लॅक थ्रिप्सपर्यंत कीटकनाशकाचा मारा पोहोचत नाही. त्यामुळे नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही.
-----------------------
यंदा मिरचीला बाजारभावही चांगला आहे, परंतु मिरचीची आवक कमी झाली आहे. यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती, परंतु फुलकिडीचा प्रादुर्भाव असल्याने पुढील हंगाम कसोटीचाच असणार आहे.
- मिलिंद मर्दे, मिरची उत्पादक शेतकरी, धाकटी डहाणू
-----------------------------
मावा, फुलकिडे, तुडतुडे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढत जातो. कीडनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने किडी औषधांना प्रतिसाद देत नाहीत. जैविक कीड नियंत्रण करून नियंत्रण मिळवले पाहिजे.
- मिलिंद पाटील, शेतीमित्र पुरस्कृत, आसनगाव (वाणगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com