वसई-विरारचे रस्ते फेरीवालेमुक्त
वसई-विरारचे रस्ते फेरीवालामुक्त
१५ हजार २१५ पथविक्रेत्यांना मिळणार विक्रीकेंद्र
वसई, ता.९ (बातमीदार)ः वसई-विरार शहरात पथविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे सार्वजनिक वर्दळीचे मार्ग अडसर ठरत आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी पालिकेने अंतिम पाऊल उचलले असून, फेरीवाला धोरण निश्चित करण्यात येत आहे. यासाठी ८२ झोनचा आराखडा तयार केला असून, लवकरच पथविक्रेत्यांसाठी हक्काचे विक्रीकेंद्र तयार होणार असल्याने शहरातील रस्ते फेरीवालामुक्त होणार आहेत.
महापालिका क्षेत्रात १५ हजार १५६ इतकी पथविक्रेते नोंद होती. पुनःसर्वेक्षणात ही संख्या ५९ इतकी वाढ झाली आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी पथविक्रेत्यांचे वाढलेले बस्तानामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यावर मार्ग म्हणून फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी हालचालींना वेग येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा, वर्दळीच्या ठिकाणी व्यवसायासाठी हातगाडी, बाकडे, मोठ्या छत्र्यांचा वापर केला जात. मात्र, पदपथ व रस्ते व्यापले जात असल्याने नागरिकांना चालणे मुश्कील होते. त्यामुळे पालिकेच्या नऊ प्रभागात पथविक्रेते धोरण आराखडा तयार करण्यात आला आहे.
--------------------------------------
लोकप्रतिनिधींची भूमिका उत्सुकतेचा
आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी याबाबतची एक बैठक घेण्यात आली. या वेळी हरकती आणि सूचना तसेच आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली असून, लवकरच प्रत्येक प्रभागात निश्चित केलेल्या जागेवर हक्काचा व्यवसाय करण्यासाठी पथविक्रेत्यांना जागा उपलब्ध होणार असून, नवनिर्वाचीत लोकप्रतिनिधींची भूमिका उत्सुकतेचा विषय आहे.
-------
वसई-विरार पालिका क्षेत्रात तात्पुरता पथविक्रेता झोन तयार आला आहे. हरकती सूचना मागवण्यात आल्या असून, लवकरच फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठीची कार्यवाही पूर्ण होणार आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त
--------
प्रभाग - हरकती / सूचना एकूण संख्या
प्रभाग समिती - (ए ) - २
प्रभाग समिती - ( बी ) - ७६
प्रभाग समिती - ( सी ) - ५१७
प्रभाग समिती - (डी ) ०४
प्रभाग समिती - ( ई ) ०२
प्रभाग समिती - ( एफ ) - ००
प्रभाग समिती - ( जी ) - ००
प्रभाग समिती - ( एच ) - ०२
प्रभाग समिती - ( आय ) ००
--------
प्रभाग निहाय झोन - पथविक्रेत्यांची संख्या
प्रभाग ए - ९ - १,३९९
प्रभाग बी - ११ - १,८१३
प्रभाग सी - ११ - २,०३५
प्रभाग डी - ४ - ९९९
प्रभाग ई - ७ - ८१८
प्रभाग एफ - ११ - १,२८५
प्रभाग जी - ७ - १,०६०
प्रभाग एच - ४ - १,३२७
प्रभाग आय - २१ - ४,४७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

