रामचंद्रनगरात ‘हर हर महादेव’चा जयघोष

रामचंद्रनगरात ‘हर हर महादेव’चा जयघोष

Published on

रामचंद्रनगरात ‘हर हर महादेव’चा जयघोष
महाकालेश्वर मंदिर प्राणप्रतिष्ठाननिमित्त कलश यात्रा
बोईसर, ता. ९ (वार्ताहर) ः रामचंद्रनगर येथील जय महाकालेश्वर मंदिरात मंगळवारी (१०) महाकालेश्वर मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ८) भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या वेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.
जगन्नाथ मंदिर येथून ही कलश यात्रा कामतेश्वर मंदिर पुढे भवानी चौकमार्गे महाकालेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. या यात्रेत हजारोंच्या वर महिला, भाविकांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी प्रमुख स्वामी भारतानंद सरस्वती महाराज व परमहंस श्री गिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभली. तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, समाजसेवक व मंदिर समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
कार्यक्रमांची रेलचेल
ब्रह्मण जगन्नाथ मंदिर ते ओस्वाल गणेश मंदिर व राम मंदिरमार्गे कामतेश्वर मंदिरापर्यंत विधिवत कलश यात्रा काढण्यात आली. मंगळवारी (ता. १०) प्राणप्रतिष्ठा विधी होणार असून त्यानिमित्त संध्याकाळी ६.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत महाभंडारा होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com