जव्हार बस चालकामुळे सुटली

जव्हार बस चालकामुळे सुटली

Published on

जव्हार बस चालकाच्या चुकीमुळे वेळेपूर्वी सुटली
चुकीची माहिती दिल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप
जव्हार, ता. ९ (बातमीदार) ः पालघर आगारातून जव्हारकडे जाणारी बस निर्धारित वेळेपूर्वीच निघून गेली होती. चालकाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असून अनेक प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.
पालघर- जव्हार- नाशिक मार्गावरील बस क्रमांक १८६६ शनिवारी (ता. ७) सायंकाळी ५ वाजता पालघर आगारात डिझेल भरण्यासाठी आली होती. या वेळी बस जव्हारकडे रवाना कधी होणार, अशी विचारणा प्रवाशांनी चालकांकडे केली होती. बस ५.३० वाजता निघणार असे सांगितले असताना प्रत्यक्षात बस ५ वाजताच रवाना करण्यात आली. परिणामी, थेट जव्हारला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. तसेच या प्रकारामुळे जव्हार आगाराचे आर्थिक नुकसानही झाले असून एसटीच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे. याबाबत जव्हार आगाराचे व्यवस्थापक बाळासाहेब झरीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही बाब कळाली असून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
--------------------------
कारवाईची मागणी
या प्रकारानंतर संतप्त प्रवाशांनी संबंधित चालकावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच एसटी बसचालकाने केलेल्या उद्धट, असभ्य, बेजबाबदार वर्तनामुळे महामंडळाची प्रतिमा धुळीस मिळाल्याचा आरोपही केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com